भिंतीचित्रांच्या माध्यमातून जनजागृती

धामणसे गावामध्ये भिंतीचित्रांच्या माध्यमातून जनजागृती उपक्रम राबविण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत स्वच्छता, पर्यावरण संरक्षण, आरोग्य, शिक्षण व सामाजिक विषयांवर आकर्षक भित्तीचित्रांद्वारे नागरिकांना सकारात्मक संदेश देण्यात आले असून ग्रामस्थांमध्ये जागरूकता निर्माण करण्यास या उपक्रमाचा मोठा उपयोग झाला आहे.