आदिशक्ती अभियान २०२५

आदिशक्ती अभियान २०२५ अंतर्गत महिलांसाठी विविध कौशल्यविकास व स्वयंरोजगाराभिमुख प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या प्रशिक्षणातून महिलांना आर्थिक स्वावलंबन, उद्योजकता, नेतृत्वगुण तसेच सामाजिक सक्षमीकरणाबाबत मार्गदर्शन केले जाते. महिलांच्या सर्वांगीण विकासाला चालना देत त्यांना आत्मविश्वासाने पुढे जाण्यास सक्षम बनवणे हे या अभियानाचे मुख्य उद्दिष्ट आहे.