ग्रामपंचायत धामणसे, ता. रत्नागिरी, जि. रत्नागिरी.

ग्रामपंचायत धामणसे ही स्थानिक स्वराज्य संस्था गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत आहे. गावातील नागरिकांना पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, वीज, आरोग्य, शिक्षण व इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे हे ग्रामपंचायतीचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
स्वच्छ, सुंदर व हरित धामणसे गाव घडविण्यासाठी ग्रामपंचायतीमार्फत विविध विकासकामे व शासकीय योजना राबविण्यात येतात. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना, रोजगार हमी योजना, स्वच्छ भारत मिशन, महिला व बालकल्याण उपक्रम, तसेच सामाजिक व आर्थिक प्रगतीसाठीचे विविध उपक्रम यशस्वीपणे गावात अंमलात आणले जातात.
गावातील लोकप्रतिनिधी व नागरिक यांच्या सक्रिय सहभागातून ग्रामपंचायत धामणसे ही पंचायतराज व्यवस्थेच्या बळकटीसह सर्वसमावेशक व शाश्वत ग्रामीण विकास साधण्याचे ध्येय बाळगून काम करते.

ऑनलाईन सेवा

मान्यवर व्यक्ती

श्री. मनुज जिंदल (भा.प्र.से.)

श्री. मनुज जिंदल (भा.प्र.से.)
जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी, रत्नागिरी

श्रीम. वैदेही मनोज रानडे (भा.प्र.से.)

श्रीम. वैदेही मनोज रानडे (भा.प्र.से.)
मुख्य कार्यकारी अधिकारी, रत्नागिरी जिल्हा परिषद